बाबा

Started by sneha31, June 17, 2018, 10:45:49 PM

Previous topic - Next topic

sneha31

लहान असतांना बोट धरून चालायला शिकवतात
तळ हातावर खेळवून फुलाप्रमाणे जपतात
स्वतः फाटके कपडे घालून मुलांना नवीन कपडे देतात
उन्हाचे चटके सोसून मुलांसाठी खाऊ आणतात

स्वतः ला त्रास असतांना मुलांची काळजी घेतात
स्वतःच दुःख लपवून सगळ्यांना खुश ठेवतात
मुलांच्या उच्च शिक्षणासाठी वन वन भटकतात
संपूर्ण परिवाराच ओझं घेऊन सकाळीच कामाला निघतात

चुकलं जरी काही तर रागावून परत मायेने जवळ घेतात
घराला घरपण देऊन सगळ्यांना मात्र बरोबर जपतात
मुलाला जवळ घेऊन जबाबदारीची जाणीव करून देतात
सगळ्यांच विचार करून स्वतःला मात्र ते विसरतात

मुलीच्या लग्नासाठी इकडे तिकडे जाऊन धडपड ते करतात
सांभाळून घ्या माझ्या लेकीला अस काळजी पोटी ते सांगतात
डोळ्यात पाणी येऊनही मनात च साठवून ठेवतात
मुलगी सासरी जाताना आशीर्वादाचा हाथ ठेऊन धायमोकळून रडतात

स्नेहा माटूरकर
भंडारा