मी स्वप्नं

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, June 20, 2018, 05:53:34 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.मी स्वप्न*

तुझ्या ओठांचा रंग अन तुझ्या मनातलं
मी तर एक स्वप्न गं तुझ्या आयुष्यातलं

चल जरा फिरून येऊ
चंद्र वेडा दुरून पाहू
चांदण्यांची मैफिल ती
रात सारी कोरून राहू

गातो गाणी दुःखाची नको सारं कशातलं
तुझ्या ओठांचा रंग अन तुझ्या मनातलं
मी तर एक स्वप्नं गं तुझ्या आयुष्यातलं

तू सुखी आहेस गं
सुंदर त्या मंदिरात
देव नाही मी पण
देवपण आहे घरात

सोडून दे सगळं आता बघ फक्त घरातलं
तुझ्या ओठांचा रंग अन तुझ्या मनातलं
मी तर एक स्वप्न गं तुझ्या आयुष्यातलं

आधार तू मनाच्या
संसार रुपी झोक्याची
नको करुस विचार तू
वेळ आहे बघ मोक्याची

कळत सार मला ही सुख तुझं सनातलं
तुझ्या ओठांचा रंग अन तुझ्या मनातलं
मी तर एक स्वप्नं गं तुझ्या आयुष्यातलं

सोड सगळं आपलं
प्रेम झिडकारून टाक
तुला जरी दूर असलो
मी आहे न फिरणार चाक

जीव लावेल अस कोण नसतं कोणातलं
तुझ्या ओठांचा रंग अन तुझ्या मनातलं
मी तर एक स्वप्न गं तुझ्या आयुष्यातलं

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर