शब्द वेडे

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, June 21, 2018, 12:50:00 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.शब्द वेडे*

गुंतलेला मी तुझ्यात गाव ते शोधत होतो
कसा तरी चालत शब्द वेडे ओढत होतो

वेदनेला जरा बाजूला सारून
मी ही पसारा आवरत होतो
टीप टीप थेंबांची बरसात होती
अन मी हळू हळू सावरत होतो

चित्र तुझे कोऱ्या कागदावर काढत होतो
गुंतलेला मी तुझ्यात गाव ते शोधत होतो
कसा तरी चालत शब्द वेडे ओढत होतो

चाळून चाळून शब्द मी
झाकण्या दुःख पांघरले होते
रोज व्हायची माझी कोंडी
म्हणून सुख सारे अंथरले होते

ओळीतून पण मधेच मी भरकटत होतो
गुंतलेला मी तुझ्यात गाव ते शोधत होतो
कसा तरी चालत शब्द वेडे ओढत होतो

भास ते तुझे रोज मज
गाढ झोपेतून उठवायचे
दुःख मनात असले तरी
सुंदर रूप तुझे आठवायचे

मन होते दिवाने मधेच का सांडत होतो
गुंतलेला मी तुझ्यात गाव ते शोधत होतो
कसा तरी चालत शब्द वेडे ओढत होतो

चोर पाऊलांनी आल्यावर
तू पंखांखाली घेतले होते
मिठी तुझी राखण करायची
अन मी ही भीतीला ठोकरले होते

भीती सोडून दे गं नेहमी हे सांगत होतो
गुंतलेला मी तुझ्यात गाव ते शोधत होतो
कसा तरी चालत शब्द वेडे ओढत होतो

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर