मन कुठं रमत नाही

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, June 22, 2018, 06:57:23 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.मन कुठं रमत नाही*

मन हलक होऊन ही मी कुठं रमतं नाही
घट्ट रहाणं आता मला नेहमी जमतं नाही

तुझी नजर का गं
अशी घायाळ करते
हृदय घट्ट करतो मी
अन तू रसाळ होते

वाट माझी मखमली काटे मिळतं नाही
मन हलक होऊन ही मी कुठं रमतं नाही
घट्ट रहाणं आता मला नेहमी जमतं नाही

चाखायचे असतात गं
ते मधाळ ओठ मला
मधेच ते आकाश ही
ढगाळ होऊन पाहते मला

चाखन कसं असतं मला हे कळतं नाही
मन हलक होऊन ही मी कुठं रमतं नाही
घट्ट रहाणं आता मला नेहमी जमतं नाही

रुणझुण झाली पैंजनाची
कान ही बघ टवकारले
ओल्या चिंब देहावर
का ते माझ्या शहारे आले

शृंगार काय आज पाहून मी जळतं नाही
मन हलक होऊन ही मी कुठं रमतं नाही
घट्ट रहाणं आता मला नेहमी जमतं नाही

पाहून जवळ येता तू
सारी धरणी सुखावते
धस्स काळीज झाले अन
पुन्हा तू नजरे आड होते

मागे पाहतो अन मागे काही उरतं नाही
मन हलक होऊन ही मी कुठं रमतं नाही
घट्ट रहाणं आता मला नेहमी जमतं नाही

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर