मनाची गल्ली

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, June 23, 2018, 12:22:58 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.मनाची गल्ली*

गल्ली आहे मनाची काळोखात लपलेली
तुझ्या त्या असण्यांन आठवांत जपलेली

विचार करून केला
मी ही तू नसल्याचा
सावध झालो तेव्हा
भानावर आलो केव्हाचा

आज कुठं तुला शोधून ही वाट संपलेली
गल्ली आहे मनाची काळोखात लपलेली
तुझ्या त्या असण्यांन आठवांत जपलेली

मी ही ठरवलं होतं
मिळवन कायमचं तुला
हात होता हाती अन
झुलवत होतो प्रीत झुला

होती मिठीत माझ्या प्रेम रंगान भिजलेली
गल्ली आहे मनाची काळोखात लपलेली
तुझ्या त्या असण्यांन आठवांत जपलेली

क्षण कसा बघ गेला
धकधक हृदयाची झाली
नसानसात तू गं राणी
जीवन होऊन आली

श्वास माझे झाले तुझे त्यात तू भिनलेली
गल्ली आहे मनाची काळोखात लपलेली
तुझ्या त्या असण्यांन आठवांत जपलेली

पोकळी मनाची आज
ही ती भरली नाही गं
स्पर्श तुझा हवा होता
वेळ ती पुरली नाही गं

ना तुला ना मला वेळ ती कधी कळलेली
गल्ली आहे मनाची काळोखात लपलेली
तुझ्या त्या असण्यांन आठवांत जपलेली

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर