गेली

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, June 24, 2018, 06:54:10 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.गेली*

नात माझ्याशी कायमच ती मोडून गेली
हात माझा कायमचा ती सोडून गेली

गाव कोपऱ्यातल्या अडगळीत होता
अन घाव यार हृदयावर ती कोरून गेली

दुःख माझे कोणा काय ते कळणार नाही
दुःखी दिव्याची वात का ती विझवून गेली

जगत होतो एकटा असा ही मी जीवनात
जगण्याची आशा सारी ती तोडून गेली

काव्य झपाट्याने माझे बहरत होते
कागदी त्या स्वप्नांनाही ती फाडून गेली

मी ही होतो तिच्यासाठी काळा पाषाण
घाव घालून दुःखाचे मज ती फोडून गेली

स्तब्ध रहायचो दिस मावळतांना हि
जीवाला तडफडत मज ती मारून गेली

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर