आठवणीच बीज

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, June 27, 2018, 06:54:25 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.आठवणीच बीज*

भिरभिरनाऱ्या नजरेवर काही उरावे का
तुझ्या आठवणीच बीज ते मनी पेरावे का

तृप्त झाली धरणी
पाय तुझे गं लागता
ठसे उमटत होते
मनी अंकुर गं फुटता

जे राहिले मागे त्यास पुन्हा गं धरावे का
भिरभिरणाऱ्या नजरेवर काही उरावे का
तुझ्या आठवणीच बीज ते मनी पेरावे का

वाहणारी मंद हवा
पांघरून बघ कसं घेते
दवबिंदूच्या सोबतीने
मनी त्या ओलावा धरते

तुलाच पाहून गं तिनं तीळतीळ मरावे का
भिरभिरणाऱ्या नजरेवर काही उरावे का
तुझ्या आठवणीच बीज ते मनी पेरावे का

टीप टीप थेंबाची
बरसात गं होते
अश्रू मनाचे का
रोजं पुसून गं नेते

सोबती गं चालतांना सांजेन ही सरावे का
भिरभिरणाऱ्या नजरेवर काही उरावे का
तुझ्या आठवणीच बीज ते मनी पेरावे का

लपंडाव रोज खेळतो
मी ही माझ्या मनाशी
नाते जोडतो बघ आहे
सांगणारे सांगतात कोणाशी

तुटणाऱ्या स्वप्नांना गं जवळ करावे का
भिरभिरणाऱ्या नजरेवर काही उरावे का
तुझ्या आठवणीच बीज ते मनी पेरावे का

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Angad Degaonkar