उनाडवारा

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, June 27, 2018, 11:19:33 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

असाच मीही कधी कधी
उनाड वाऱ्या सारखा उनाड होऊन भरकटत असतो
इथल्या प्रेम भावनेच्या
विरोधात प्रचार करत
पण न्याय मिळतच नाही कधी

काही तरी असे पण मिळाले
गालीच्या असतो अंथरलेला
त्यांच्या वाटेवर तरी काट्यांवरून चालणं त्यांना आवडत
जुन्या आठवणींना नेहमी उजाळा देऊन ते
मनात न विझणारी ज्योत
घेऊन
तीळ तीळ जगण्यात
ते सर्वस्वी मानतात
खरंच ना किती वाईट गोष्ट आहे
खर प्रेम करणारे असंच मरतात
अन खोट्याला मनात थारा दिला जातो
त्यांच्या मनावर गोंदलेलं असतंच त्यांचं न पुसणार नाव

असो पण मी असाच बरा आहे एकटा
स्वतःच्या विश्वात जगणारा

एक आनंदी व्यक्ती

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर