एकटा

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, June 29, 2018, 07:05:01 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.एकटा*

एकटाच असतो दिवसाची रात होतांना
तो दिवा ही एकटा असतो राख होतांना

दूर असतात नेहमी
आपले एक होतांना
प्रेम असतंच अस रे
ते दिसतात दूर जातांना

पाहिलं आहे प्रेमाला नेहमी मात खातांना
एकटाच असतो दिवसाची रात होतांना
तो दिवा ही एकटा असतो राख होतांना

स्तब्ध असतो नेहमी
तो चाफा अंगणातला
सुगंधित अत्तराला ही
नेहमीच का छेडण्याला

तू आलीस अन गेलीस का वाद होतांना
एकटाच असतो दिवसाची रात होतांना
तो दिवा ही एकटा असतो राख होतांना

जपली आहेत आजही
तुटलेली लखतरे हृदयाची
जात पाहतो मग तुटलेल्या
न जोडणाऱ्या तुकड्यांची

गुंतणार नाही पुन्हा तुझा नाद होतांना
एकटाच असतो दिवसाची रात होतांना
तो दिवा ही एकटा असतो राख होतांना

निबंध माझ्या जीवनाचा
तुझ्याविना कोराच राहिला
शेवट आज ही हाती माझ्या
सुई विना दोराच राहिला

उसवणार शिवणार कसा गं वात येतांना
एकटाच असतो दिवसाची रात होतांना
तो दिवा ही एकटा असतो राख होतांना

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर