अंतर

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, June 29, 2018, 11:47:09 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.अंतर*

सागराला कळले नाही आपले अंतर हे
तुला ही कळेल जेव्हा मी गेल्या नंतर हे

गोष्ट आपली होतीच
अशी की कळणार नाही
खरंच तूच सांग आता मी
कोणाला का समजणार नाही

झिजून गेला देह का संपले नाही अत्तर हे
सागराला कळले नाही आपले अंतर हे
तुला ही कळेल जेव्हा मी गेल्या नंतर हे

अवकाश झाला सारं
ते मज कळण्याला
तू आहेस अशी की
भाव खातेस बोलण्याला

किती दिवसांचे पडले आहे मागे उत्तर हे
सागराला कळले नाही आपले अंतर हे
तुला ही कळेल जेव्हा मी गेल्या नंतर हे

सकाळ माझी तुझा
फोटो पाहून व्हायची
लगबगी नं नकळत
तू समोरून जायची

घोळ काय हा झाला समजणा खरतर हे
सागराला कळले नाही आपले अंतर हे
तुला ही कळेल जेव्हा मी गेल्या नंतर हे

प्रारब्धात शोधतो आहे
सांज पुन्हा मिलनाची
कावर बावर मन व्हायचं
तू समोर जेव्हा नसायची

काय केले असे माझ्या हृदयावर मंतर हे
सागराला कळले नाही आपले अंतर हे
तुला ही कळेल जेव्हा मी गेल्या नंतर हे

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर