कविता

Started by kumud kadam, July 05, 2018, 01:11:36 AM

Previous topic - Next topic

kumud kadam

मला काही प्रेम होतच नाही

माझं हृदय धडधडतंच नाही
आठवण कोणाची येतच नाही
जीव कोणासाठी झूरतंच नाही
मला काही प्रेम होतच नाही....

सोबतीला माझ्या कोणीच नाही
एकांत मला जाणवतच नाही
सहवास कोणाचा सोसतच नाही
मला काही प्रेम होतच नाही...

पंचपकवान गिळवतंच नाही
आपले कोण ? परके कोण?
समजतच नाही
चांगल्या-वाईटाची पारखंच नाही
मला काही प्रेम होतच नाही....

रात्री कधी जागतंच नाही
स्वप्नात कोणी येतच नाही
भिविष्यवाणी करतच नाही
मला काही प्रेम होतच नाही...

खोट कधी बोलतच नाही
खरंच..! माझं...!
प्रायव्हेट कोणी नाही
कोणाशी एकमत होतच नाही
मला काही प्रेम होतच नाही...

शीट ऑफर कोणाला करतंच नाही
हाॅर्न कोणासाठी वाजवतच नाही
पाठलाग कोणाचा करतंच नाही
मला काही प्रेम होतच नाही....

अभ्यासा शिवाय सूचंल कस काही
होमवर्क माझे मीच करतो
मदत कोणाची घेतंच नाही
नक्कल काही जमतच नाही
मला काही प्रेम होतच नाही....

चकरा कोणाच्या बकरा कोणाचा
कधी करतच नाही
रोमॅन्टीक कधी होतच नाही
गळाभेट कोणाशी होतच नाही
रडत तर मी...मुळीच नाही
मला काही प्रेम होतच नाही...

माझावर कोणी रूसतच नाही
जाळ् मी प्रेमाचं टाकतच नाही
अहो मला काही जमतच नाही
मन माझे कुठे रमतच नाही
मला काही प्रेम होतच नाही..

मस्ती...कुस्ती कळतच नाही
मागे-पूढे कोणाचा करतच नाही
कसं असतं
कसं दिसतं....प्रेम.....
मला काही प्रेम होतच नाही..