कविता

Started by kumudkadam, July 05, 2018, 01:17:33 AM

Previous topic - Next topic

kumudkadam

नको सुख रंगवलेले
व्यसनांसारखे कातानं
तोडून नाती जीवनात
जोडलेली सगळी रक्तानं

मला जगायचाय जीवन
माझं स्वाभिमानानं

नको भाव चुरगळलेले
ग्रासून भेदभावानं
हवी आहे समानता
सजवलिली सुस्वभावानं

मला जगायचाय जीवन
माझं स्वाभिमानानं

नको जगणं स्वार्थासाठी
बरबटलेले अहंकारनं
मिळकत सारी आयुष्याची
लाभलेली तिरस्कारनं

मला जगायचाय जीवन
माझं स्वाभिमानानं