कविता तुझी भेट

Started by kumudkadam, July 05, 2018, 01:20:55 AM

Previous topic - Next topic

kumudkadam

असता तु जवळ
मन बेभान माझे होई
हृदय नाचे थुई थुई
बसता जाई उठता जुई
मनी फुलांचा वर्षाव होई

मुग्ध मुग्ध होती कर्ण
बोलांचे अमृत घेण्या प्राशून
त्रुप्त ञुप्त होती भाव
दुःखांनाही नेण्या सुखावून
अशी ओढ लावी तुझी भेट

न बोलता बोलती तुझे नयन
सामवून घेसी जीवन मरण
देह बोली जणु शाश्वत वचन
दु:खांनाही विषासवे करण्या पचन
अशी ओढ लावी तुझी भेट