कविता

Started by kumudkadam, July 05, 2018, 01:28:25 AM

Previous topic - Next topic

kumudkadam

जगून घ्यावे कुशीत धरणीच्या

कुशीत धरतीच्या
ओंजळीत भुतलांच्या
फुलांत कमळांच्या
सामावून जीवन घ्यावे
जगून घ्यावे कुशीत धरणीच्या

झ-या परि खळखळूण
कळी परि उमलून
सागरा परि अंथरुण
जीवन घ्यावे सुधारूण
जगून घ्यावे कुशीत धरणीच्या

झोपावे चादरीत वनाच्या
गुणगुणावे मिठीत हिरव्या तनाच्या
चिवचिवाटात चिमण्याच्या
मंञमूग्ध कर्ण करून घ्यावे
जगून घ्यावे कुशीत धरणीच्या