कविता..ती संसारी दंग आहे

Started by kumudkadam, July 05, 2018, 01:36:56 AM

Previous topic - Next topic

kumudkadam

भरते जीवनात रंग आहे
मुला बाळांचा संग आहे
तिला प्रेमाचा छंद आहे
ती संसारी दंग आहे

अंगाई गाते तान्ह्यासाठी
घास भरवतेय चिमूकल्यांना
विसरून सखा-सखी
तिला जगण्याची ओढ आहे
ती संसारी दंग आहे

पाहूचाराची जबाबदारी
तिची घरासाठी खबरदारी
घर कुळाची जिम्मेदारी
सुखी संसाराची आस आहे
ती संसारी दंग आहे

परंपरा वाढवत आहे
संस्कृती ती जपत आहे
जनगोत सांभाळत आहे
तीला स्वतःचा अभिमान आहे
ती संसारी दंग आहे

सध्या ती ताईचे,आईचे
सध्या ती पत्नीचे
किरदार निभावत आहे
तिच्यात घराचे घरपण आहे
ती संसारी दंग आहे