कविता

Started by kumudkadam, July 05, 2018, 03:04:55 AM

Previous topic - Next topic

kumudkadam

एकांतात मज
भास तुझा होतो
भासामध्ये तुझा
सहवास होतो

हळूवार मग
अंधारतो दिस
काळोखातही तुझा
चेहरा दिसतो

एकांतात बोलू
लागते शांतता
शांततेत तुझा
स्वर निनादतो