कविता..तु असा दुर का ?

Started by kumudkadam, July 05, 2018, 03:10:42 AM

Previous topic - Next topic

kumudkadam

मंद मंद वा-यात,सुगंधीत निरोप
शहारे देत तनास, भरत मनात हुरूप

विरहाची सावली,पाठमोरी कुरूप
बदलते क्षणात,घेते सुंदरशे स्वरूप

सांगावा आसतो त्यात,भेटीचा सुगावा
सांगतच वाहते जणु,धीर धरा नाखवा

वा-यातील गारवा,तनाशी भिडावा
मोहरून आठवांना,देह तुजसाठी रडावा

रंग ऋतुने बदलावा,गाल आसवात भिजावा
अन् म्हणावे झंझावाताने,तु असा दुर का ?