कविता..मला प्रिये तुझे प्रेम बघ खुणावतय

Started by kumud kadam, July 05, 2018, 03:36:57 AM

Previous topic - Next topic

kumud kadam

तुझ्यातंच मन माझे रमु लागलय
जिथे तिथे तुलाच शोधु ते लागलय
भेटीसाठी तुझ्या एका झुरू ते लागलय
मला प्रिये तुझे प्रेम बघ खुणावतय

काही करमेना तुझा विना झालय
स्वप्नात भलत्याच गुंगु लागलय
रात दिस रात सारखं जाग जागतय
मला प्रिये तुझे प्रेम बघ खुणावतय

गंधात प्रेमाच्या चिंब चिंब भिजलय
काळजाला तुझेच गं प्रेम हे भिडलय
तुझ्यावर मन माझे आगाध जडलय
मला प्रिये तुझे प्रेम बघ खुणावतय

डोळयातुन अश्रु कसले वाहतय
आता मला काही कळतय ना वळतय
मन फक्त तुझ्या मागे मागे पळु लागलय
मला प्रिये तुझे प्रेम बघ खुणावतय

भेटून तुला माझा प्रितीच्या फुला
बघ मग कसे ते बहरू लागलय
आता मला कळतय ना काही वळतय
मन फक्त तुझ्या मागे मागे पळतय
मला प्रिये तुझे प्रेम बघ खुणावतय