कविता

Started by kumud kadam, July 05, 2018, 03:43:53 AM

Previous topic - Next topic

kumud kadam

आली होती मला
      ती एकदा भेटायला
मनात दडलेल्या
      तिच्या प्रेमाला बघायला
दिली होती साथ
      तिने एकदा मला
दिला होता घाव
     जेंव्हा मनाने मला
दिले होते मला
      तिने तिचे प्रेम
आला होता दुःखाना
     जेंव्हा माझ्या जोम
केले होते स्मित हास्य
     तिने माझ्याकडे पाहुन
भरलेल्या मनातल्या
     तिच्या प्रेमासाठी वाहुन
उभारली होती माझी खाट
     पाहुन आंधळ्या प्रेमाचा थाट
उजाडली होती बनून पहाट
    गुरफटलेल्या विरहाच्या अंधारात