कविता

Started by kumudkadam, July 05, 2018, 03:52:16 AM

Previous topic - Next topic

kumudkadam


हरवून स्वप्नात गेलो
न्हाहून शब्दात घेतले
चिंब-चिंब मन ओले-ओले झाले
प्याले ओव्यांचे नित्य पिले

पाघरला शालू लेखनीचा
सुरेख मंजूळ कवितेचा
लढवून तर्क रचतो ओळी
केली शब्दांची गोड-गोड गोळी

कधी-कधी रंगतो विडा
आठवणींची घेवून रास
शब्दांची होते शब्दांशी चूरस
होते ओवी सर्वस्वी सरस

अजरामर होण्या शब्दांगणात
धडपडतेय माझी लेखनी
आकाश-पाताळी साहित्यसंग्रही
ओळ न् ओळी रगण्या सोहळी