कविता

Started by kumudkadam, July 05, 2018, 04:00:58 AM

Previous topic - Next topic

kumudkadam

पंख पसरवुनी निघाली

नाही प्रांत नाही कुठली सीमा,करत जगी परिक्रमा
कोठली नवलाई,घेवून अनुभव नभ-नभांचे
होवुनी एकसंघ करूनी थवे,शोधण्या काय ते नवे
गवसणी अथांग सागरी,घेवूनी झेप अंबरी

पंख पसरवुनी निघाली
शोधण्या एक नवीन निवारा

दाणे चोचीत वेचुनी,रानोरानी नाचुणी
चिव चिव ऐकवूनी,गेली प्रवासी परतुनी
काडी काडी जोडुनी,घर रिकामे ठेवुनी
उंचावुनी आकाशी,अंग अंग फडफडवूनी

पंख पसरवुनी निघाली
शोधण्या एक नवीन निवारा

पिल्लांना घेवूनी,चांदणे शिंपुणी
ठेवुनी आठवणी,गात नवी गाणी
डोहात न्हाहुनी,फळफळे खावुनी
जीव लावूनी,जीव तळमळवुनी

पंख पसरवुनी निघाली
शोधण्या एक नवीन निवारा

Atul Kaviraje

     कुमुद मॅडम, "पंख पसरवून निघाली" या आपल्या कवितेतून, आपण पक्षी जीवनावर झोत टाकला आहे, असे मला वाटते. पक्ष्यांचा निवारा,घर, किंवा घरटे, हे काही कायमचे नसते, बरेचसे पक्षी हे नवीन घरट्यासाठी, स्थलांतरित होत असतात, हे नैसर्गिक असते.

     नवीन घरट्याचा शोध, वेध घेण्यासाठी पक्षिणीला काय काय दिव्य करावे लागते, अथक प्रयास करावा लागतो, आपल्या लहान जिवलगांना, पिल्लाना घेऊन, त्यांच्या चोचीत दाणा भरविण्यास , काडी काडी जोडून नवीन घरटे तयार करण्यास तिला जी मेहनत करावी लागते, पंखातले बळ  तिला कसे कायम ठेवावे लागते,  याचे उत्तम चित्रीकरण आपण या कवितेतून केले आहे.

     कवितेतील गहन अर्थ जाणवला, व मनास भावला. अश्याच भावपूर्ण , अर्थपूर्ण कविता आपण यापुढेही लिहाल , अशी मनापासून आशा करतो, व यापुढील आपल्या कवितेच्या प्रवासास सदिच्छा देतो.

      आज इथे, तर उद्या तिथे
      सूर मारितें शोधण्या नवं निवारा
      काडी-काडीने घरटे बांधिते
      देऊन पिल्लाना पंखाखाली आसरा.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-३१.०५.२०२१-सोमवार.