कविता :- हे वरूण राजा

Started by कदम, July 05, 2018, 11:25:50 AM

Previous topic - Next topic

कदम


दडुन राहसी का रे मुदामून
का कोसळत नाही होऊन जलधारा


हे वरूण राजा,तु जागतो कि नाही
सुक्या नदी नाल्यांना पाणी पाजतो कि नाही


हे वरूण राजा बरसतो कि नाही
कोरड्या घस्यांची तहान भागवतो कि नाही


हे वरूण राजा मेघधारा घेवूनी येतो कि नाही
मातीत पाझरूण गंध मृदेला देतो कि नाही


हे वरूण राजा,मेघगर्जना करतो कि नाही
ओशाळल्या भुचरास शहारतोस कि नाही