कविता

Started by कदम, July 05, 2018, 11:31:34 AM

Previous topic - Next topic

कदम


आठवणींच्या वाटेवरती जशी पावलं
चालू लागतात


आठवणींचे कोष सारे सभोवताली
जमू लागतात


क्षण एक एक त्यातील जागे होवू
लागतात


बदललेल्या सगळ्यांचा वाटा
पुन्हा हळुहळु जुळू लागतात


आठवणी पुन्हा माझ्याशी तोच विषय
बोलू लागतात


झाल्याबद्दल आठवणींचा भाग
दिलगिरी व्यक्त करू लागतात