कविता

Started by kumud kadam, July 05, 2018, 12:26:10 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

प्रेम असते एक प्रबळ भावना
किशोर मनातील प्रोढ याचना
प्रेम असते दोन मनातील कामना
त्यात असते आनंदाची अलोचना


प्रेम असते जणू भावनांची लाट
गात वाहते आपलाच अलाप
सागर भावनांचे जिने उसळते अफाट
प्रेम असते दोन किनार्यांचा मिलाप


प्रेम असते एक नाजुक बंधन
हृदयाचे सौंदर्य वाढवणारे चंदन
प्रेम असते मनातील अदृश्य गोंदणं
उगवतं सहजीवनी नात्यांचं चांदणं