कविता

Started by kumudkadam, July 05, 2018, 12:41:42 PM

Previous topic - Next topic

kumudkadam

नभाला फुटलाय पाझर
पाऊस घालतोय जागर
ढगांची चढवुन चादर
गुलाबी थंडीची देवून झालर

वृक्षानींही कांती जुनी टाकली
पाना-फुलांनी फांदी-फांदी सजली
सुरू झालाय पशूंचा मुक्तविहार
टप टप झेलून थेंबाचा प्रहार

सृष्टी यथावत होतेय गोजिरी
झेलून चिंब होतेय पावसाची सरी
आकाशी-शिवारी येतोय बहर
नभाने गर्जत करता ललकार