कविता

Started by kumud kadam, July 05, 2018, 12:44:16 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

येईल कधीतरी उन्हात
वा-याची थंड झुळूक बनून
येईल कधीतरी पावसात
शिरी पाण्याची सरी बनून

येईल कधीतरी झोपेत
गडत राञ स्वप्नाळू बनून
येईल कधीतरी अंतर्मनी
भावपुर्ण अंतरंग बनून

येईल कधीतरी निशब्द ओठांवर
मधूर शब्द तिचे घेवून
येईल कधीतरी वाटेवर
रूंद अशी पाऊलवाट बनून

येईल कधीतरी जीवनात
देहात माझ्या ञाण बनून
येईल कधीतरी सुन्न अंगणात
ऊभी राहील स्वागतोत्सुक बनून