कविता

Started by kumudkadam, July 05, 2018, 01:10:13 PM

Previous topic - Next topic

kumudkadam

लागली कुणाची वसुंधरेला नजर
होताहेत भुतली पशू-पाखरे बेघर
नक्षञ पावसाचे झाले खोटे
धरतीवर आणले कोणी संकट मोठे

हिरवाईची त्या काय नवलाई करावी
मिळाली जागा तिथे वृक्षारोपणे केलेली
पहाडां जागी जमलेत ईमारतीचे जथ्थे
कशाचेही मानवाला राहीले नाही पथ्य

प्राणवायु एकची झाला तोही विषारी
मती मारली झाला माणूस श्वासास भिकारी
जेथे तेथे पेटताहेत कार्बनच्या वखारी
वसुंधरेला केला कोणी स्वार्थासाठी आजारी

नदी-नाले कोरडे पडतात बेफाम
माणूस झाला ऐश्वर्याचा गुलाम
ना राहिली सुगी न राहिला हंगाम
दुष्काळ माजतोय ईथे बेलगाम

लेकरांची आई ती काळी माती होती
आज ती भयाण हा दुष्काळ सोसती
आक्रदून धरती थरथर कापते
प्रदूषणाच्या ओझ्याखाली वसुंधरा वाकते