कविता

Started by kumud kadam, July 05, 2018, 01:22:55 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

प्रेमजग ते वेगळेच असते
जिथे फक्त प्रेम आणि प्रेमच असते
जेंव्हा प्रेमी सोबत असतात
तेव्हाही जेंव्हा क्षण दुराव्याचे असते
प्रेमजग ते प्रेमीयांचे असते

एकमेकांच्या विचारात रमणे
एकमेकांसाठी राञभर जागणे
सारखे चेहरा एकमेकांचा निहाळणे
रंगीबेरंगी घालून कपडे नटणे
जगावेगळ्या अनुभवांचे असते

हाकेच्या अंतरावर असतात दोघे
दोघांचीही भुमीका मुक्याची असते
व्यापक व्याप्ती प्रेमाची असते
भिती तव नसते प्रेमीयांना कशाची
प्रेमजग सर्व दोघांचेच असते