कविता

Started by kumud kadam, July 05, 2018, 01:26:49 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

तुझ्यासोबत बोलताना
बोलत मी रहावे
बोलाताना तुझ्याशी
मी जगास विसरून जावे

मी मनातील माझ्या
तुला कानात सांगावे
अन् मनात घर करून
मी तुझ्या मनी रहावे

प्रत्येक शब्द माझा
तुझ्यासाठीच असावा
नव्या आपल्या प्रेमाचा
नवा ईतिहास घडावा

राणी तुला करावं
अन् राजा मी असावं
मनीच्या साम्राज्यावर आपल्या
नाव एकमेकांचे कोरावे