चातकतृष्णा

Started by sanjweli, July 13, 2018, 02:39:51 PM

Previous topic - Next topic

sanjweli

सोनसळी रेखीव छाया,
विसावली पर्वतराजी,
रविकिरणांची माया,
वर सजला नटला मेघराजा कृष्णसावळा,

नेसली नऊवारी वधु वसुंधरा,
घालुन शालु पोपटी हिरवा,
मंडप सारा निळ्या अस्मानीचा,
कुहु कुहु बोलली गानकोकीळा,

चातकतृष्णेचा मेघ गरजला,
कडाडली तळपली,
सळसळती विद्युतमाला
खळखळ करीत निर्झरही बोलला,

धर्म तो आहे वाहण्याचा पाण्याचा,
आस मिलनाची ओढ लागली,
पर्वा नाही वळणाची वेगाला,
आतुर आता सरिता सागरभेटीला,

रिमझिम बरसला,
बंधने सोडुन सारी,
टिप टिप करीत ताल मृदुगांचा,
वरुणराजा भेटीला आला,वरुण राजा भेटीला आला.

©म.वि.
©sanjweli.blogspot.com
9422909143