बंदी

Started by sanjweli, July 13, 2018, 03:00:31 PM

Previous topic - Next topic

sanjweli

सारं २०१८ वर्ष पहा बंदीचं आहे,
गुबु -गुबु वाजतं सारखं सरकार नंदीचं आहे,
नोटा बंदी झाली होती पहा उघड्या डोळ्यानी,
वेठीला आताही सर्वसामान्य जनता आहे,

नोटांचा वारेमाप ढिगारा सापडला होता,
पण कोणाला काही नाही बोलायचे,
न्यायदेवताच पहा कशी आता,
डोळे बांधुन प्रतिक्षेत आहे,

दारुबंदी झाली होती,
सेंटी होते सारे झाले,
पहा अंतर ५०० मीटरचे,
आता कुठे लवलेशही उरले आहे,

भाईयो-बहनोची घोषणा झाली,
तिजोरी सरकारची भरली,
अच्छा दिनाचा वादा,
आता तरी सांगा कुठे लोपला आहे,

दिखाऊ माल सगळा आहे,
सारा फसवा-फसवीचा खेळ आहे,
चहावाले म्हणुन आले,
कसे पहा राज्यकर्ते बनले,

उर पहा कसा या कसायांचा,
आता भरुन आला आहे,
गोपाल गोकुळाचा कलियुगात आता,
प्लॅस्टीकबंदीच्या नावाने अवतरला आहे.

🙊🙊🙊🙊🙊🤐🤐🤐🤐🤐

©म.वि.
©sanjweli.blogspot.com
९४२२९०९१४३