गोकुळेची राधा

Started by Shubham Surjuse, July 14, 2018, 12:09:36 PM

Previous topic - Next topic

Shubham Surjuse

*राधा*


पिवळी चोळी, ती साधीभोळी, वेष तीचा साधा।
वेड लाविले जिने तयाला, गोकुळेची ती राधा।।

मुख चंद्र जणू, कमनीय तनु, स्वर्गातून अवतरली।
भान विसरून मुग्ध झाली, ऐकूण ती मुरली।।

कृष्णास भिडली, प्रेमात पडली, मिलनाची तिला आस।
प्रेमाचा तो अजब सोहळा, म्हणती तया महारास।।

सावळा कृष्ण, सुंदर राधिका, प्रेमाची हि कहाणी।
वैजयंती श्यामच्या गळ्यात घातली, तीच ही राधारानी।।

वेळ आला, विरह झाला, भरला यमुनेचाही पाट।
राधा वाटेवर लावून डोळे, पाहते त्याची वाट।।

प्रेमाची ती, अधुरी कहाणी, जन्माची ती सखी।
राधाकृष्ण अमर झाले, प्रेमाचे ते पारखी।।


                                           ~इतिशुभम~