सांज किनारी

Started by Çhèx Thakare, July 18, 2018, 08:48:55 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

रोज सांज किनारी,
तो सूर्य बहरुनी येतो
बाहुत घेऊनि वारा,
नारंगी शालू होतो

हळूच हलकी बट ती,
श्यामल नयनावर येते
छेडुनी अलगद बट ती,
कृष्णाची राधा होते

मी अविरत उभा राहतो,
पाहुनी क्षितीजाच्या रेषा
नेसुनी भरजरी शालू
उल्हसित करते तू हर्षा

शोधूनि वाट किनारी,
तुझ्यास्तव जेव्हा येते
पाहुनी ते रूप सोनेरी,
तू सांज किनारी होते

सागर ही पहात असतो
ते रूप तुझे मनमोहक
मी ही भुलतो मज तेव्हा
आशेने होऊन चातक

तू हळूच चालत येते
गजरा तो माळत येते
देऊन मिठीत सारे प्रेम
तू सांज शहारा देते ..

© चेतन ठाकरे



Balasaheb patil

✍🏻 *आठवण येणे*
                *'आणि'*
           *आठवण काढणे*
     *यात खुप फरक आहे....!*
*आपण आठवण त्यांचीच काढतो,* 💞💞
      *जे आपले आहेत.........!*
                 *'आणि'*
        *आठवण त्यांनाच येते,*
*जे तुम्हाला आपले* *समजतात.........!* 💞💞

      💐🌺 *शुभ रात्री*🌺💐
*Babalu Patil*