व्हावं कधी

Started by शिवाजी सांगळे, July 19, 2018, 02:54:47 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे



व्हावं कधी

सुरात गुंफण्या कुणी गेय व्हावं कधी
ओठी लावण्या कुणी पेय व्हावं कधी

द्यावा उधळून जीव तुम्हावर कुणीही
येवढ्या प्रेमा योग्य प्रिय व्हावं कधी

शिखर ईतके अत्युच्च गाठ तु रे मना
समीप येण्यास कुणा ध्येय व्हावं कधी

स्वार्थ सगळाच कर्मात सोडावा असा
याव लाटण्यास कुणी श्रेय व्हावं कधी

आपल्याच नशेत रमतो जो तो हल्ली   
राखण्या कैफ मादक पेय व्हावं कधी

© शिवाजी सांगळे
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९