कचऱ्यात वाटा

Started by शिवाजी सांगळे, July 21, 2018, 06:02:38 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

कचऱ्यात वाटा

एका एकाचं नशीब असतं
हल्ली कचऱ्याचं उघडलं,
त्याच्या पण विल्हेवाटीत
भ्रष्टाचाराचं कुरण फुटलं !

डंपिंग ग्राउंड आणि आता
सगळ्यांचेच खिसेही भरले,
सर्वसामान्यांच्या नाकी मात्र
त्याच्या दुर्गंधीचे श्वास उरले !

सत्ताधारी, विरोधी न् बाकी
घेतात एरव्ही नफ्यात वाटा,
विल्हेवाट लावा कचऱ्याची
नेउन घरात आपलाही वाटा !

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९