फुलांचा बाजार येथे !!

Started by श्री. प्रकाश साळवी, July 22, 2018, 02:54:56 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

भरतो फुलांचा बाजार येथे
भरतो मनाचा आजार येथे!
**
नसतो फुलाला अधिकार येथे
रोजच होतात बलात्कार येथे
**
सुगंध ही नव्हता पिकला अजून
तरीही गंध पहा लूटणार येथे
**
ते दू:खही थोडे रडून गेले
कोणासाठी आता रडणार येथे
**
कुस्करल्या कळ्या कितीतरी
कसले दू:ख जळणार येथे
**
वासनांची भरली मंडई ही
पहा फुलांना आता विकणार येथे
**
प्रकाश साळवी
बदलापुर - ठाणे
२३-०७-२०१८