लेवा साहित्यिक

Started by Asu@16, July 29, 2018, 07:45:21 PM

Previous topic - Next topic

Asu@16

    लेवा साहित्यिक

साहित्यिक आम्ही लेवा
बहिणाईची गुणी लेकरं
पांग फेडू या मायेचं
गाठू यशाची उंच शिखरं

एक सूर अन् एक ताल
एक असे आमची चाल
शत्रूंच्या आक्रमणाला
पुढे करू आमची ढाल

सामर्थ्य असे लेखणीचे
ढालीचे, ना तलवारीचे
प्रेम घेऊ अन् प्रेम देऊ
जग सारं  जिंकून घेऊ

समाजस्थिती घडवू ऐसी
स्वर्गात् अपि गरीयसी
उंच गगनी जाईल लेवा
देवांनाही होईल हेवा

-प्रा.अरुण सु.पाटील (असु)

https://www.facebook.com/AsuChyaKavita