एक कविता, पुलं ची म्हणून WhatsApp वर फिरतेय. ती खरंच पुलं ची आहे का? कसे कळेल?

Started by KavitaRajiv, August 04, 2018, 08:29:46 AM

Previous topic - Next topic

KavitaRajiv

कॉलेज जीवनात माझी एक
मनीषा होती, की संगीता वर प्रेम करावं !
तशी भावना  ही माझ्या मनात होती !
प्रेरणा तर रोजच भेटायची!
माझी साधना तर पक्की होती!
पण आशा  जवळ असताना ही,
माझ्या पदरात आकांक्षा पडली !
माझी अपेक्षा अपेक्षाच राहीली !
आणी माझ्या जवळ आता फक्त
कल्पना राहीली !
तर
मला सांगा  " कविता " कशी वाटली..
ही कविता पुलंची आहे का?