सोबत...

Started by myvgworld, August 04, 2018, 11:41:43 PM

Previous topic - Next topic

myvgworld

vjthink.blogspot.com

सोबत...

सोबतीला माझ्या आहेस तू नेहमी
अशीच सोबत देशील का ?
कधीतरी चिडलो चुकून ओरडलो
तरी मला समजून घेशील ना ?

राग व्यक्त होतो तुझ्यावर
प्रेम हि व्यक्त करतोच कि
तू हि चिडतेस रुसतेस माझ्यावर
तेंव्हा मीही तुझ्यामागे झुरतोच कि

लाडाने बोलतेस हक्काने सांगतेस
अशीच बोलत राहशील ना ?
रुसवा काढायची अन तुला हासवायची
संधी मलाच देशील ना ?

येतील नवं नवीन नाती पुढे,
हे नातं अतूटच ठेवशील ना ?
सुखीच राहा नेहमी तू,
माझं हि सुख वाटून घेशील ना ?
माझं हि सुख वाटून घेशील ना ?


vj

प्रेम हे असं भावनिक मिश्रण आहे की ते कधीच विसरलं जाऊ शकत नाही.👍