मैत्रीण

Started by Prasad Chindarkar, February 16, 2010, 10:30:04 AM

Previous topic - Next topic

Prasad Chindarkar

मैत्रीण

आहे माझी एक मैत्रीण
कवितेच्या विश्वात रमलेली
तिची आणी माझी मैत्री
अगदी नुकतीच जमलेली

काय सांगू तिच्याबद्दल
ती आहे एक सुंदर कविता
सहज तरल पण तितकीच भावूक
जणू परिस स्पर्शाची मोहकता

जशी एक सुंदर कविता
तन मन मोहून टाकते
तसे तीचे निर्मल अस्तित्त्व
जगण्याची नवी उमेद देते

मला ती रोज भेटते
तिच्या कवितांमधून
बोलते माझ्याशी ती
तिच्या कवितांमधून

असे वाटते,

ऐकतच रहावे तिला
तिच्या कवितांमधून
अनुभवाव तिला
तिच्या कवितांमधून

अशी आहे माझी मैत्रीण

            ................प्रसाद  8)

nirmala.

so sweettttttttttttt

chane tujhi kawitaaaaaaaaa :)

PRASAD NADKARNI


santoshi.world


gaurig

wa.....khupach chan aahe tuzi maitrin........ :)  keep it up Prasad........ :)