रसिकांस….

Started by Asu@16, August 10, 2018, 10:58:50 AM

Previous topic - Next topic

Asu@16

'असुच्या कविता' पेज लाईकच्या द्विशतकपूर्ती निमित्त -

         रसिकांस....

महान बिहान काही नसतं
आपल्या मनातलं प्रेम असतं
खऱ्या खुऱ्या रसिकांच्या मनात
अलगद जाऊन पटकन बसतं
धन्यवादाचा अधिकार असावा
आपल्यामध्ये नको दुरावा
आपल्या कृपेने काव्य करतो
सदा आपले उपकार स्मरतो
असाच लोभ सदा असावा
व्यक्त होण्या अनमान नसावा.

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita