गावात तिच्या

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, August 13, 2018, 09:44:22 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.गावात तिच्या*

फिरुनी उगाच का आलो गावात तिच्या
प्रेम दिसले नाही जराही घावात तिच्या

वाटेतला वाटसरू होतो
अंगणात पाऊल टाकता
तू पाहिले नाहीस जरासे
का मला समोर ठाकता

नसा भिनभिनल्या होत्या हातात तिच्या
प्रेम दिसले नाही जराही घावात तिच्या

नदी ओसंडून वाहते
अश्रूंचा बांध फुटतो
जेव्हा मागे न पाहता
मनी हुंदका दाटतो

हुंदका ही दिसला नाही श्वासात तिच्या
प्रेम दिसले नाही जराही घावात तिच्या

रोज जायचो दारात
भीक प्रेमाची मागायला
खेटर दाऊन ती सांगते
तिच्या खडूस भावाला

आग होती तेव्हा दिसली भावात तिच्या
प्रेम दिसले नाही जराही घावात तिच्या

का इतकी निष्ठुर वागली तू
प्रेमाची कदर ना केलीस तू
खऱ्या प्रेमाचा बाजार मांडला तू
जाता जाता चिता पेटलीस तू

कधी प्रेम खोट ना भासलं डावात तिच्या
प्रेम दिसले नाही जराही घावात तिच्या
फिरुनी उगाच का आलो गावात तिच्या

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर