स्वप्न प्रिया

Started by शिवाजी सांगळे, August 15, 2018, 04:09:37 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

स्वप्न प्रिया

तो अलगद निघून चालला
सोडीत तांबूस कोवळे उन..!
नाहत्या उन्हात ती अवतरली
परडीत दवाळ फुले घेऊन..!!

प्रतिबिंबात नाजूक थरथरला
खांद्यावरील अल्लड शेव..!
दवबिंदू मधाळ करते झाले
चेहऱ्या वरील सिग्न्ध भाव..!!

धूरा समवेत नाचरे कवडसे
रमले खिडकीच्या तळाशी..!
ओल्या पायांची चर्चा झाली
किनकिनत्या पैंजण द्वयांशी..!!

ज्योतींचे पंचकही सजले
समईच्या नक्षी तबकावरती..!
कमनीय ती मृदुल तनया
अर्पिते गंधफुले देवा वरती..!!

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९