डसते जखम का

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, August 17, 2018, 06:13:35 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.डसते जखम का*

अंतरात दुःख सारे लावले जरी मलम का
कातडी उघडीचं असते डसते जखम का

दैवाने ना दिले कधी
मला तुझे सुख असे
पेलतो नेहमीच मी
विरहाचे दुःख हे कसे

झाकण्या जात माझी भरजरी तलम का
कातडी उघडीचं असते डसते जखम का

प्रेम अंतरात घट्ट होते
तुझा सुगंध होता हवेत
रात्र बिछान्याला होती
मृत्यू जसा होता कवेत

प्रेम खोटे असले तरी सारे हे नियम का
कातडी उघडीचं असते डसते जखम का

का वेगळा मी होऊ
तुझ्या त्या नखऱ्याने
मला ही सारे कळू दे
चूक काय केली मुखड्याने

तू गोरी मी काळा तरी यात  रक्त सम का
कातडी उघडीचं असते डसते जखम का

मला माहीत असतं
तू माझी होणार नाही
खरंच तुझ्या माझ्या स्वप्नांना
पुन्हा मी रंग देणार नाही

शून्य झाली प्रेम भाषा लाजली कलम का
कातडी उघडीचं असते डसते जखम का
अंतरात दुःख सारे लावले जरी मलम का

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर