दाद

Started by शिवाजी सांगळे, August 17, 2018, 11:39:02 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दाद

पहाटेलाच तुझी आठवण छळाया लागली
मनात तेव्हा एक कविता घोळाया लागली
 
सुगंध आज मोगऱ्याने सर्व घरात सांडला
जेव्हा हलकेच ती गजरा माळाया लागली

सांगितले नाही कुणी नियम तीला घरातले
आपणच होउन ती सारे पाळाया लागली

प्रेमात मुरली अशी नशा दोघांत त्यागाची
वृत्ती खरी परस्परांस मग कळाया लागली

उमजताच भाव काव्यातला जसाजसा तीला
अन् दाद नेमक्या शब्दाला मिळाया लागली

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९