आयुष्यातून जाताजाता ...

Started by Pravin Bhaskarrao Gawali, August 18, 2018, 08:46:52 PM

Previous topic - Next topic

Pravin Bhaskarrao Gawali

आयुष्यातून जाताजाता ...
उसंत नव्हती कसलीच
तुझे शब्द ऐकता ऐकता
का रे असा दुर गेलास ...
फक्त एकदाच मागे वळून बघ
या जगातून जाता जाता
          प्रेमाचे प्रतिक म्हणे गुलाब असते
          तू मात्र गुलाब घेतलास
          पण काट्याची वेदना मला देऊन गेलास
          माझ्या आयुष्यातुन जाता जाता ...
मी तर तुझीच रे राधा
पण मला मात्र तू मीरा बनवलंस
माझ्या आयुष्यातुन जाता जाता...