सृष्टी आनंद

Started by शिवाजी सांगळे, August 20, 2018, 01:11:34 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

सृष्टी आनंद

बांधले ओढ्याने, काल चाळ पायाला
छुमछुम खळखळ, स्वर गमे कानाला

दूर कड्यावर, सावळमेघ डोंगर माथी
गिरीशिखरा त्या, चुंबाया दौडत आला

तप्त धरा तृप्तली, अशी अमृत थेंबानी
गंधाळली मृदाही, चराचरी वेग भरला

अतृप्त एक तरू, तृषार्त कैक मासाचा
लेण्या हिरवाई, मुक्तपणे चिंब नाहला

आनंदली झाडे, वेली, पशु, पक्षी सारे
नाद वाऱ्याचा, पावरीसम घुमु लागला

दान नभाचे घेता, सकलां आनंद देता
जाहला आनंद, सृष्टीस आनंद जाहला

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९