कोरडा मान्सून

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, August 21, 2018, 08:39:26 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.कोरडा मान्सून*

कधी न पाहिलेला काल पाहून झाला
डोळ्यां भोवताली कोरडा मान्सून झाला

लगबग पाहून तुझी
रात जवळी आली
चंद्र ही लपला मग
तेव्हा सकाळ न्हाली

राग कवेत घेता गुंता सारा काढून झाला
डोळ्यां भोवताली कोरडा मान्सून झाला

सोडून दिलं सारं
मी तुझ्या मिठीत गं
जाग आली तेव्हा मला
खंजीर घुसला पाठीत गं

प्रेम रोग गं हा मला तुझ्यापासून झाला
डोळ्यां भोवताली कोरडा मान्सून झाला

नुकसान कधी झाले
मला कळलेच नाही
नशीब होते असे की
कधी फळफळेच नाही

मढ्या समोर कोरडा दिवा लावून झाला
डोळ्यां भोवताली कोरडा मान्सून झाला

सरण बोलवत होते
जरा लवकर येणा
खोटी असली तरी
तिला पण रडू देणा

मरण म्हणते हा खूण कोणाहातून झाला
डोळ्यां भोवताली कोरडा मान्सून झाला
कधी न पाहिलेला काल पाहून झाला

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर