झरा

Started by Dnyaneshwar Musale, August 22, 2018, 11:48:58 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

झुळ झुळणारा झरा
झिरपत येतो डोंगर दऱ्या फिरून,
दिसणार नाही पुन्हा
डोळ्यात घेतो एकदाच मनसोक्त भरून.

सारखाच तो मला खळखळून
हसताना दिसतो,
मग मी ही त्याला पाहुन पाण्यात
जाऊन बसतो.

सोभवतालची झाडी त्याची
असते खुप हिरवीगार,
गुंतलेल्या वेलींचे दिसते
किती त्याचे सुबक दार.

आई म्हणते माझ्या सारखाच
तो ही आहे खुप शुर,
थांबत नाही कधी
धावत जातो खुप दुर.