रंग श्रावणाचे

Started by Dnyaneshwar Musale, August 23, 2018, 12:07:10 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

रिमझिमनारी सरी
घेऊनी आला श्रावण घरी
टपटपणाऱ्या धारा
बोलुन गेला वारा,,,,,,
नवचैतन्याचा जिव्हाळा
घेऊन आला दारा.....

कुणास येई खमंग वास
कुणास असे उपवास,
फुलवऱ्यातले पीक बोले
येणार घरी धन धान्याची रास.....

चिव चिवणारी  चिऊ गाणे गात जाई
माळावरची गुरे हसुन घरट्याकडे पाही,,,,,,
तहानलेल्या दगडावरला झुळ झुळनारा झरा
आडवळणी वाटेला घेऊन जाई घरा.....

मना मनाला भिजनारा हा श्रावण मास
घेऊन येई कधी धुके, कधी श्रावण पाहळ्या,,,,,,
रंगबेरंगी, दाराशी निजलेल्या
हलकेच फुलणाऱ्या श्रावणातल्या कळ्या....